राजकारण गाईड
*राजकारणाचं गाइड*
राजकारणापासून चार हात लांबच राहायला पाहिजे अशी सर्वसामान्य माणसाची वृत्ती असली तरी चांगल्या माणसांनी ठरवून राजकारणात गेलं पाहिजे...
राजकारणापासून आणि राजकारण्यांपासून चार हात लांब राहणंच चांगलं ही मध्यमवर्गीय मनोवृत्ती असते. राजकारण म्हणजे भ्रष्ट, राजकारण म्हणजे काहीतरी घाणेरडं असं म्हणत त्या क्षेत्रापासून चार हात लांब राहण्यातच धन्यता मानली जाते. राजकारणी माणसाबद्दलही तीच भावना असते. वास्तविक लोकशाही व्यवस्थेत लोकांचे प्रश्न अजेंडय़ावर आणण्यासाठी, सोडवण्यासाठी राजकीय व्यवस्थाच सगळ्यात महत्त्वाची ठरते. स्वातंत्र्यचळवळीत पर्यायाने तत्कालीन राजकारणात सामान्य, मध्यमवर्गीय लोकांनी मोठय़ा प्रमाणात भाग घेतला होता. पण नंतरच्या काळात राजकारण बदलत गेलं. सामान्य माणूस त्यापासून लांब गेला. वाढते घोटाळे, लाचलुचपती, गुंडगिरी या सगळ्याचं राजकीय क्षेत्रातलं प्राबल्य वाढत गेलं आणि हळूहळू राजकारण हे चांगल्या माणसांचं क्षेत्र नाही, असंच समजलं जायला लागलं. खरं तर हे अंडं आधी की कोंबडी आधी या तिढय़ासारखंच आहे. राजकारण भ्रष्ट कारण सामान्य माणसांना पुढे करून आपला हैतु पुर्ण होईपर्यंत काही राजकीय महानग सामान्य लोकांचा वापर करून नंतर चोरांनाच सामील होत असतात त्यामुळे चांगली माणसं तिकडं फिरकत नाहीत आणि चांगली माणसं राजकारणात येत नसल्यामुळे राजकारणाचा दर्जा काही सुधारत नाही....
*राजकारण करायच पण ते सर्वाच्या विकासाच तरच आपण आदर्श समाज, आदर्श तरुण, आदर्श गाव निर्माण करू शकतो.*

Comments
Post a Comment